विद्यापीठांची जागतिक क्रमवारी निश्चित करणाऱ्या ‘टाईम्स हायर एज्युकेशन’ या संस्थेच्या आशिया खंडातील विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या शंभरात भारतातील आठ शिक्षणसंस्थांचा समावेश झाला आहे.

विद्यापीठांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, परदेशी विद्यार्थ्यांची संख्या या निकषांनुसार विद्यापीठांची क्रमवारी निश्चित केली जाते.

यंदा भारतातील ५६, तर आशिया खंडातील ४८९ संस्था यात सहभागी झाल्या होत्या. चीनमधील सिंगुआ विद्यापीठ, पेकींग विद्यापीठ आणि सिंगापूर येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर ही विद्यापीठे क्रमवारीत सर्वात अव्वल ठरली आहेत.

भारतीय संस्था आणि क्रमवारी

आयआयएससी बंगळुरू (३६), आयआयटी रोपड (४७), आयआयटी इंदूर (५५), आयआयटी खरगपूर (५९), आयआयटी दिल्ली (६७), आयआयटी बॉम्बे (६९), आयआयटी रुडकी (८३), आयसीटी मुंबई (९२).