News Flash

खडसे-दाऊद संभाषणप्रकरणी तातडीने सुनावणीस नकार

६ जून रोजी नियमित खंडपीठाकडे ही याचिका सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने भंगाळे याला या वेळी केली.

खडसे-दाऊद संभाषणप्रकरणी तातडीने सुनावणीस नकार

महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित भ्रमणध्वनी संभाषणाप्रकरणी ‘हॅकर’ मनीष भंगाळे याने केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सोमवारी नकार दिला. मात्र ६ जून रोजी नियमित खंडपीठाकडे ही याचिका सादर करण्याची सूचनाही न्यायालयाने भंगाळे याला या वेळी केली.

या प्रकरणामुळे आपल्याला धमकवण्यात येत असून धोका असल्याचा दावा करत भंगाळे याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच संरक्षण उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. शिवाय राजकीय दबावामुळे स्थानिक व मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा नि:पक्ष तपास होण्याची शक्यता नसल्याने या सगळ्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशीची मागणीही त्याने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 3:40 am

Web Title: eknath khadse dawood call case
टॅग : Dawood,Eknath Khadse
Next Stories
1 पालिकेची मधुमेहाबाबत जनजागृती
2 उत्तरपत्रिका घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी हवी!
3 ‘एमडीएस’च्या जागा ‘एआपीजीडीईई’मधून भरण्याची मुभा
Just Now!
X