गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वत:च्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आज सकाळापासूनच मुख्यमंत्री खडसेंना अधिकृतपणे राजीनामा देण्याचा आदेश देणार असल्याची चर्चा रंगली होती. काही वेळापूर्वीच एकनाथ खडसे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला.
आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकनाथ खडसे यांना दुरध्वनी केला होता. यावेळी त्यांनी खडसेंना मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा देण्यास सांगितले. तुमच्यामुळे पक्षाची अजून बदनामी होऊ नये, यासाठी राजीनामा द्या, असे गडकरींनी खडसेंना सांगितल्याचे समजते. दरम्यान, सध्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि विनोद तावडे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात मुंबईतील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एकनाथ खडसे यांची पत्रकारपरिषद होणार आहे. यावेळी खडसे कशाप्रकारे त्यांची भूमिका मांडतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
* भाजपचे ‘भुजबळ’
* …या आरोपांमुळे खडसेंना द्यावा लागला राजीनामा
* खडसेंचा राजीनामा नको, बडतर्फीच हवी
* संघालाही खडसे नकोसे!
* निराधार आरोपांवर उत्तर देण्यापेक्षा मला माझं काम करू द्या- एकनाथ खडसे
* भूखंड ३.७५ कोटींचा, पण मुद्रांक शुल्क ३१ कोटींवर..
* एकनाथ खडसेंची कॅबिनेट बैठकीला दांडी; लाल दिव्याची गाडीही नाकारली
* वादळांचे येणे-शमणे..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 11:18 am