विविध आरोपांमुळे बेजार झालेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे नेमके आहेत तरी कुठे? हा प्रश्न निर्माण झाला असताना अखेर त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मला एक जबाबदार कृषीमंत्री म्हणून शेतकऱयांची कामं करू द्या, असे ट्विट खडसे यांनी केले आहे. राज्याच्या महसूल मंत्रीपदासोबतच त्यांच्याकडे कृषीमंत्रीपद देखील आहे. पण यावेळी खडसे यांनी महसूल मंत्रीपदाचा कुठेही उल्लेख न करता केवळ कृषीमंत्रीपदाचा उल्लेख करत ट्विट केल्याने विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. खडसे यांना ट्विटमधून नेमके काय सुचवायचे आहे, याचा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. माझ्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप म्हणजे नियोजित कट असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाचा आदेश कळवावा, असा आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याचेही वृत्त आहे. शहा यांच्या आदेशानंतर गडकरी आणि खडसे यांच्यात फोनवर बातचीत झाल्याची माहिती  देखील सुत्रांनी दिली आहे.

खडसे यांनी केलेले ट्विट-