News Flash

‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या निवडणुकीसाठी कलावंतांची रणधुमाळी

राजकीय निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होणार हे अपेक्षितच असते.

| September 4, 2015 12:24 am

राजकीय निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होणार हे अपेक्षितच असते. तथापि ‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या येत्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नवोदित कलावंतांसह दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे. वासुदेव कामतआणि अनिल नाईक या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या पॅनलविरोधात जुने व तरुण तुर्क कलावंत एकवटले असून ‘दी मुंबई आर्ट सोसायटी पॅनल’ने ‘मास’च्या माध्यमातून आव्हान उभे केले आहे.जवळपास अडीच हजार कलावंत मतदार असून जहांगीर आर्ट गॅलरी येथे येत्या पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एसएमएस, व्हॅट्सअ‍ॅप तसेच पत्र्रक काढून करण्यात येत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत चित्रकला-शिल्पकलेसाठी कोणतेही ठोस काम तर झाले नाहीच शिवाय संस्थेवर ४७ लाखांचे देणे निर्माण झाले आहे. ज्या विकासकाने वांद्रे येथील संकुलाचे काम केले ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप या निवडणुकीनिमित्त होत असून वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल विकासकाकडून सुमारे ३५ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला नाही. इमारतीची आजच दुरवस्था असून चित्रकार व शिल्पकारांसाठी कोणत्याही ठोस योजना गेल्या पाच वर्षांत राबविण्यात आल्या नसल्याचे ‘माल’ पॅनलमधून अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या विजय राऊत यांनी सांगितले.या पॅनलमधून सचिवपदासाठी विठ्ठल लोखंडकर, खजिनदारपदासाठी विक्रांत मांजरेकर तर सदस्यपदासाठी रवींद्र साळवी, उत्तम पाचारणे, प्रभाकर पाटील, उत्तम चापटे, ज्ञानेश्वर जगदाळे, आनंद प्रभुदेसाई व जय कवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर कामत-नाईक पॅनलमधून वासुदेव कामत अध्यक्षपदासाठी, चंद्रजित यादव सचिवपदासाठी आणि सुरेंद्र जगताप खजिनदारपदासाठी उभे असून अनिल नाईक, माधवी गांगण, गणपत भडके, अिजक्य चौलकर आणि नीलेश किंकळे हे सदस्यपदासाठी उभे आहेत. वासुदेव कामत यांना विचारले असता सर्वानी एकत्र येऊन कलेच्या विकासासाठी काम करण्याची गरज असून पूर्वीच्या काळात झालेल्या घटनांचे आरोप उगाळण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. विद्यमान कार्यकारिणीची मुदतवाढ ही नियमानुसार करण्यात आली असून सर्वसाधारण सभेचा निर्णय धर्मादाय आयुक्तांनाही कळविण्यात आला आहे. कलावंतांनी राजकारण करू नये एवढे भानही विरोधक बाळगण्यास तयार नसल्याचे वासुदेव कामत यांनी सांगितले. एकीकडे सामान्य कलावंतांना जहांगीर आर्ट गॅलरी मिळणे दुरापास्त झाले आहे तर दुसरीकडे वांद्रे संकुलातही त्यांना संधी मिळत नसल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवोदित कलावंतांना संधी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला दालनांबरोबर कराराच्या आश्वासनाप्रमाणेच भारतातील कलावंतांना व्यापक संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्टय़ा सोसायटी भक्कम करणे, देश-विदेशात कलावंतांची संमेलने भरवणे, कला स्कॉलरशीप व एक्स्चेंज कार्यक्रम राबविण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे ‘मास पॅनल’तर्फे अध्यक्षपदाच्या लढतीत असलेल्या विजय राऊत यांनी

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 12:24 am

Web Title: elections of the bombay art society
Next Stories
1 पदरमोड करून गोविंदा जल्लोषात साजरा करण्याचा निर्धार
2 शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जी पुन्हा चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात
3 कामगारांच्या देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद
Just Now!
X