साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेच्या खरेदी दरात प्रति युनिट ३२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वीज खरेदीचा दर ६.२७ रू.वरून ६.५९ रू. होईल अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महावितरण कंपनी सध्या ३.४८ रु. दराने विज खरेदी करते. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी ही वीजदरवाढ मान्य करण्यात आली असून त्यामुळे सरकारवर वार्षिक ५० कोटीेचा अतिरिक्त बोजा पडेल. अशा प्रकारे वाढीव दराने वीज खरेदी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने वीज खरेदीबाबत ११४ साखर कारखान्यांशी करार केला असून सध्या १०१ प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातून १ हजार ७४३ मेगाव्ॉट वीज मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.