News Flash

इन फोकस : गजराजाचे ‘आनंद’स्नान

प्राणी-पक्षी भेदभाव विसरून एकत्र येतात, तसेच काहीसे चित्र भायखळ्यातील जिजामाता उद्यानातही पाहायला मिळते आहे

उन्हाच्या काहिलीने बेजार झालेले आपण थंड होण्यासाठी शीतपेय पिण्यापासून ते थंडगार पाण्यात डुबण्यापर्यंत अनेक गोष्टींचा आपण आधार घेतो. एरव्ही जंगलात राहिले असते तर या मुक्या प्राण्यांनीही उन्हापासून वाचण्यासाठी एखाद्या थंडगार तळ्याकाठी आसरा घेतला असता. पण जंगलापासून कोसो दूर असलेल्या आणि पिंजऱ्यात राहून लोकांची मने रिझवणाऱ्या या प्राण्यांना ‘थंड’ होण्यासाठीही माणसांवर अवलंबून राहावे लागते. ‘जंगल बुक’मधून शहरातल्या ‘राणीच्या बागे’त आलेल्या या प्राण्यांना बसणाऱ्या वैशाख वणव्याच्या या झळा जरा कमी व्हाव्यात यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. जंगलात जसे तळ्याकाठी सगळे प्राणी-पक्षी भेदभाव विसरून एकत्र येतात, तसेच काहीसे चित्र भायखळ्यातील जिजामाता उद्यानातही पाहायला मिळते आहे. या कृत्रिम तळ्यात डुंबत राहून थंड होण्याची गंमत हत्तीला अनुभवता येणार नाही कदाचित, मात्र तळ्यातील बादलीभर पाण्याच्या शिडकाव्यानेही मिळणारा आनंद लाखमोलाचा आहे.
अमित चक्रवर्ती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 1:23 am

Web Title: elephant at mumbai byculla jijamata udyan zoo
टॅग : Elephant
Next Stories
1 देशभरातील कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘आर्ट हब’
2 बांधकाम आराखडा दाखवणे विकासकाला आता बंधनकारक
3 ‘आयईएस’ शाळेच्या प्रवेशांना स्थगिती
Just Now!
X