News Flash

सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला ‘एलिफंटा महोत्सव’

1 आणि 2 जून रोजी हा महोत्सव पार पडणार आहे

सूर, संगीत, शिल्प आणि चित्रकलेचा आविष्कार असलेला ‘एलिफंटा महोत्सव’ एलिफंटा अर्थात घारापुरीच्या बेटांवर पार पडणार आहे. यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी हा महोत्सव होणार आहे. ‘स्वरंग’ ही या सोहळ्याची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला आदींची रेलचेल असणार आहे.

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.1 जून) सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक कैलास खेर यांचा शिवआराधना या विषयावरील होणारा सुराविष्कार कार्यक्रम या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण आहे.

रविवारी ( 2जून) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घारापुरीच्या बेटावर असलेल्या शिव शिल्प लेण्यांचे दर्शन घडवणाऱ्या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग संस्था, अनाथाश्रमातील सदस्यांना लेण्यांची सफर घडवली जाणार आहे. शिवतांडव, योगमुद्रा, शिवप्रतिमा, गंगावतरण, अर्धनारीनटेश्वर, त्रिमूर्ती आदी प्राचीन शिल्प लेण्यांचे दर्शन वंचितांना घडावी या पर्यटन मंत्री रावल यांच्या संकल्पनेनुसार या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी 7 वाजता घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत चित्रकलेचा अनोखा मिलाफ पहायला मिळणार आहे. प्रख्यात गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. यावेळी सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार निलेश जाधव, शील कुंभार आदी शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार लाईव्ह सादर करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 5:46 pm

Web Title: elephanta mahotsav to be held gharapuri caves
Next Stories
1 मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
2 सावंतांच्या निष्ठेवर ‘मातोश्री’ची मोहोर!
3 रावसाहेब दानवे केंद्रात ; भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?
Just Now!
X