07 August 2020

News Flash

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगरासह राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून आतापर्यंत मुंबई महानगरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी १ लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते शनिवारी झाले. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना माहितीपुस्तकेही ऑनलाइन मिळणार असून त्याचे शुल्कही कमी करण्यात आहे. यंदा २२५ रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना माहितीपुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल. माहितीपुस्तकात महाविद्यालयांसंबंधात तसेच, प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, नियम, प्रक्रिया कशी करावी, अर्ज, महाविद्यालयांचे पात्रता गुण (कट ऑफ) आदी माहिती  मिळणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत १ लाख ९२ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील १ हजार ३२४ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:53 am

Web Title: eleventh admission process started aabn 97
Next Stories
1 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह
2 वाहतूक सिग्नलवर आता महिलांच्याही चिन्हाकृती
3 करोनाविरोधात लढण्यासाठी राज्याने केलेल्या उपाययोजनांचा आढावा
Just Now!
X