19 January 2021

News Flash

अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

मराठा विद्यार्थी खुल्या गटात; पात्रता गुणांत वाढ

(संग्रहित छायाचित्र)

जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर झाली असून, या यादीत मराठा प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण लागू न करता या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्यात आले आहे. परिणामी मुंबई महानगर परिसरात दुसऱ्या फेरीचे पात्रता गुण पहिल्या फेरीच्या तुलनेत साधारण पाच गुणांनी वाढले आहेत. या फेरीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. अर्ज केलेले ७९ हजार ५७९ अद्यापही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

अकरावीची पहिली फेरी झाल्यानंतर मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मराठा प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर अकरावीची दुसरी फेरी झाली. या फेरीसाठी १ लाख ५५ हजार ८१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ७६ हजार २३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही या फेरीत घटली आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील.

झाले काय?

मुंबई महानगर परिसरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीच्या दुसऱ्या यादीतील प्रवेश पात्रता (कट ऑफ) गुणांमध्ये पहिल्या फेरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. साधारण पाच गुणांनी (एक टक्का) या फेरीचे पात्रता गुण वाढले आहेत. विशेषत: वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठीची चुरस वाढली आहे. मराठा प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या गटात समाविष्ट करण्यात आल्या. मात्र बहुतेक नामांकित महाविद्यालयांमधील जागा पहिल्या फेरीतच भरल्या होत्या. दुसऱ्या फेरीसाठी एखाद दुसरीच जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे पहिल्या फेरीप्रमाणेच बहुतेक महाविद्यालयांचे पात्रता गुण आहेत, तर काही महाविद्यालयांचे गुण वाढले आहेत.

दुसऱ्या फेरीतील प्रवेश पात्रता गुणांची टक्केवारी (कंसात पहिल्या फेरीचे गुण)

* एचआर  – वाणिज्य : ९४ (९३.८)

* केसी  – कला : ८९.८ (९०.२)  वाणिज्य : ९२.२ (९२.२)  विज्ञान : ९० (८९.४ )

* जय हिंद  – कला : ९२.८ (९२.६)  वाणिज्य : ९२.८ (९२.६)   विज्ञान : ८९.२ (८९.४)

* रुईया – कला : ९४ (९४.२)

विज्ञान: ९४.८ (९४.८)

* पोद्दार – वाणिज्य : ९४.२ (९४.२)

* रुपारेल – कला : ८९.२ (९१.२)  वाणिज्य : ९१.६ (९२)  विज्ञान : ९२.८ (९३.४)

* साठय़े – कला : ८१.८ (८५.८)  वाणिज्य : ९०.४ (९१) विज्ञान :  ९१.२ (९२.८)

* डहाणूकर – वाणिज्य : ९१.६ (९२.४)

* भवन्स – कला : ८१.४ (८४.४)

वाणिज्य : ८९.२ (९०.६)  विज्ञान : ८८.६ (९०.२)

* मिठीबाई – कला : ८९.२ (८९.४)  वाणिज्य : ९१.६ (९१.८)   विज्ञान : ८९.२ (८९.८)

* एनएम  – वाणिज्य : ९५.२ (९४)

* वझे-केळकर – कला : ९१ (९१.६)  वाणिज्य : ९३.६ (९३.६)   विज्ञान : ९३.८ (९४.४)

* झेविअर्स – कला : ९४.६ (९४.६)  विज्ञान : ९०.६ (९१.४)

शाखा   उपलब्ध जागा   महाविद्यालय

मिळालेले विद्यार्थी

कला   १७,४६४ ७,४३३

वाणिज्य ७९१८२  ४६,६००

विज्ञान  ४७,२०२ २१,५८८

किमान ३,१८५ ६१०

कौशल्याधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी)

शाखानिहाय पसंतीक्रमानुसार विद्यार्थी संख्या

पसंती   कला   वाणिज्य विज्ञान  एमसीव्हीसी

पहिला २,९८२  १०९४४  ५९५७   ५४२

दुसरा   १४०२   ६९५६   ३९०३   ५४

तिसरा ८६६ ६१३३   २७५१   १०

चौथा   ६३९ ५३७४   २४२८   ४

पाचवा ५२१ ४५९७   १९१९   ०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:31 am

Web Title: eleventh second admission list announced abn 97
Next Stories
1 दंड चुकवणाऱ्यांची घरे शोधून वाहने जप्त
2 विमानतळावर तपासणीस असहकार्य केल्यास गुन्हा
3 ‘काँग्रेस नेतृत्वावर टीका टाळा’
Just Now!
X