05 March 2021

News Flash

शहरी नक्षलवाद : नऊ आरोपी मुंबईतील विशेष न्यायालयासमोर हजर

अटकेत असलेल्या नऊ विचारवंत आरोपींना शुक्रवारी प्रथमच मुंबईतील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आल्यावर या प्रकरणी अटकेत असलेल्या नऊ विचारवंत आरोपींना शुक्रवारी प्रथमच मुंबईतील विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र यापुढे त्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग   च्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्याचे आदेशही न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिले.

जानेवारीमध्ये प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर १४ फेब्रुवारीला पुणे न्यायालयाने आरोपींना शुक्रवारी  विशेष न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या सगळ्यांना आर्थर रोड व भायखळा महिला कारागृहात हलवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे, वरवरा राव, अरूण फरेरा, सुधा भारद्वार, शोमा सेन व वेर्नन गोन्साल्विस या सगळ्यांना शुक्रवारी विशेष ‘एनआयए’ न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी १३ मार्चपर्यंत तहकूब केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:02 am

Web Title: elgar parishad case nine accused appear before nia court in mumbai zws 70
Next Stories
1 नरेंद्र मेहता यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
2 देशातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी – छगन भुजबळ
3 VIDEO : एलियनचा शोध घेणारं यान अन् मुंबईचं म्युझिकल कनेक्शन
Just Now!
X