मुंबई : पॉर्न पाहतानाचे पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या ई-मेलने सध्या मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये धुमाकू ळ घातला आहे. विशेष म्हणजे या ई-मेलची सुरुवात ग्राहक किं वा वापरकर्त्यांच्या पासवर्डने होत असल्याने त्याचा धसका मोठा आहे.

आम्हाला माहीत आहे की हा तुमचा पासवर्ड आहे. व्हायरस असलेल्या पॉर्न संकेस्थळांवर तुम्ही भ्रमंती केलीत. त्यामुळे तुमच्या संगणक, भ्रमणध्वनीत व्हायरस शिरला. या व्हायरसने तुमचा पासवर्डच नव्हे तर तुम्ही पॉर्न पाहतानाचे छायाचित्र आणि चित्रण आम्हाला उपलब्ध करून दिले आहे. हे पुरावे सार्वजनिक होऊ नयेत असे वाटत असेल तर आम्हाला बीटकॉईनच्या माध्यमातून खंडणी द्या, अशी धमकी देणाऱ्या ई-मेलने टाळेबंदीच्या काळात पुन्हा डोके  वर काढल्याची माहिती राज्याच्या सायबर विभागाने दिली आहे. ई-मेलप्राप्त व्यक्तींचे पासवर्ड त्यात नमूद आहेत. त्यामुळे संभाव्य नाचक्की टाळण्यासाठी काहींनी खंडणी दिली आहे, तर काही खंडणी देण्याच्या तयारीत आहेत, अशी माहितीही या विभागाला मिळाली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट युगात विविध सेवा, अ‍ॅप वापरताना ई-मेल खाते, पासवर्ड अनेक ठिकाणी साठवला जातो. तेथून तपशिलांची चोरी झाल्यास आणि तपशील ऑनलाइन भामटय़ांच्या हाती लागल्यास निव्वळ पासवर्ड पुढे करून, पुरावे असल्याचे भासवून अशा प्रकारे खंडणीची धमकी दिली जाऊ शकते.

असे ई-मेल प्राप्त झाल्यास घाबरून न जाता सायबर पोलिसांकडे तक्रार करावी. असे प्रकार टाळण्यासाठी एक पासवर्ड प्रत्येक माध्यमासाठी वापरू नये किंवा फार काळ वापरू नये, भ्रमणध्वनी किं वा संगणकात व्हायरस  प्रवेश करणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशा

सूचना राज्याच्या सायबर विभागाचे अधीक्षक बालसिंग राजपूत यांनी दिल्या आहेत.