05 June 2020

News Flash

Coronavirus : अत्यावश्यक सेवेकरींचा संकटांशी सामना

फेऱ्यांचे सदोष नियोजन सामाजिक अंतराचे तीन-तेरा

फेऱ्यांचे सदोष नियोजन सामाजिक अंतराचे तीन-तेरा * बेजबाबदार प्रवाशांचा त्रास

मुंबई : टाळेबंदीतही वैद्यकीय, शासकीय, पालिका कर्मचाऱ्यांची व मालगाडय़ांची ने-आण करणारे बेस्ट-एसटीचे चालक, वाहक आणि मालगाडय़ांवरील लोको पायलट या अत्यावश्यक सेवेकरींना वेगवेगळ्या संकटांशी सामना करावा लागत आहे. फे ऱ्यांचे सदोष नियोजन, कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान नसणे, बेजबाबदार प्रवासी यांमुळे हे सेवेकरी हैराण झाले आहेत.

बेस्टचे वाहक यशवंत पाटील सध्या गोराई ते मुलुंड स्थानक या मार्गावर कार्यरत आहेत. प्रवासात ते डॉक्टर, अन्य वैद्यकीय व पालिका कर्मचारी इत्यादी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. बेस्टकडून मास्क, सॅनिटायझर देण्यात येत असले तरीही करोनाचा धोका हा राहतोच. काही वेळा प्रवासादरम्यान अन्य प्रवासीही घुसखोरी करतात. यात काही बिनकामाचे किं वा विनाकारण बाहेर पडलेले ज्येष्ठ नागरिकही असतात. त्यांना समजवताना कधीकधी खटकेही उडत असल्याचे पाटील सांगतात. आगारांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता नाही. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवले जात नाही.

बेस्टचे चालक सागर शिंदे यांनीही आगारात नियोजनाचा अभाव असल्याचे सांगितले. त्यासाठी बेस्ट उपक्र माने लक्ष देऊन सर्वच आगारांत नियमांचे पालन होते की नाही हे बघितले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. प्रवासात अनेकांशी संपर्क आल्यामुळे घरी गेल्यावर प्रथम अंघोळ करणे, कपडे धुवायला घेणे इत्यादी नित्यक्र म करावा लागतो, असे पाटील व शिंदे म्हणाले.

मध्य रेल्वेवर मालगाडय़ांवर साहाय्यक लोको पायलट म्हणून काम करणारे रमेश काकडे सध्या जीवनावश्यक वस्तूंची  ने-आण करतात. कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये आणि मालगाडी निश्चित ठिकाणी वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी मोठी असते. दुसऱ्या क्षेत्रीय रेल्वेला मालगाडीची जबाबदारी सोपवल्यानंतर ती गाडी पुढे वेळेत जाईल का, लोकांना अन्यधान्य वेळेत मिळेल ना सध्या अशी िंचंताही लागून राहते. मात्र रेल्वेचे लोको पायलट ही जबाबदारी योग्यरीतीने पेलतात असे काकडे म्हणाले. बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५ एप्रिलला पत्र पाठवून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

प्रवाशांशी जवळून संपर्क

दादर ते पनवेल मार्गावर एसटीचे वाहक म्हणून काम पाहणारे महेश शिंदे यांनी वाहक म्हणून काम करण्यास सध्या अनेक जण घाबरत असल्याचे सांगितले. दिवसभराच्या प्रवासात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचे तिकिटावर नाव, कर्मचारी क्र मांक व अन्य माहिती घ्यावी लागते. यात बराच वेळ जातो, शिवाय त्यांच्याशी जवळून संपर्क येतो. त्यामुळे काही वाहक कामावर येणे टाळतात. एसटी प्रशासनाकडून मास्क, सॅनिटायझर दिले जाते. मात्र ते अपुरे पडत असल्याचे, शिंदे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 2:44 am

Web Title: emergency services staff facing various problems zws 70
Next Stories
1 उच्च न्यायालयाच्या दूरचित्रसंवाद सुनावणीत आता सर्वसामान्यांनाही सहभागी होण्याची सुविधा
2 राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे दोन सत्ताकेंद्रे
3 चेहरा न झाकल्यास आता तुरुंगवास
Just Now!
X