प्रेरणादायी भाषणांसह बैठे खेळ, ग्रंथालय आणि योगासनांचा तासही

मुंबई : पोलीस दलाने मरोळ येथे उभारलेल्या रुग्णालयात (कोव्हीड के अर सेंटर) उपचारांसह रुग्णांचा वेळ जावा, त्यांचे मानसिक स्वास्थ्य वाढावे या उद्देशाने निरनिराळे उपक्र म, प्रयोग सुरू आहेत. पोलीस दलातलेच आरजे रुग्णांचे मनोरंजन करतात. वाचनप्रिय रुग्णांसाठी रुग्णालयात पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. याशिवाय कॅ रम, बुद्धीबळासारखे खेळ, प्रेरणादायी भाषणे, प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांशी विशेष संवाद असे उपक्र मही सुरू करण्यात आले आहेत.

मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वसतीगृहाची इमारत ताब्यात घेऊन तेथे हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे २५६ खाटा असून लक्षणे नसलेल्या, सौम्य संसर्ग असलेल्या पोलीस, त्यांच्या कु टुंबियांवर उपचार होत आहेत. पोलिसांव्यतिरिक्त राज्य आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारीही येथे उपचार घेत आहेत. महिन्याभरात पाचशेहुन अधिक रुग्ण ठणठणीत होऊन परतल्याचे रुग्णालयाची जबाबदारी असलेले उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

रुग्णालयात तज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवकांचा चमू आहे. पण उपचारांसोबत रुग्णांचा वेळ जावा, त्यांना घरचे जेवण मिळावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे घार्गे सांगतात. प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अंडी, दूध याबरोबरच दोनवेळचे सकस, पोष्टीक आणि घरचे जेवण रुग्णांना दिले जात आहे. रुग्णांना गरम पाणी पिता यावे, गुळण्या करता याव्यात यासाठी प्रत्येक खोलीत चोख व्यवस्था आहे. त्यासोबत येथे प्रेरणादायी, विनोदी, हलक्याफु लक्या दिडशे पुस्तकांचा संग्रह आहे. ज्यांना पुस्तके  वाचायची नाहीत त्यांच्यासाठी कॅ रम, बुद्धीबळ पट उपलब्ध करून देण्यात आला आहे. एरव्ही रुग्ण दिवसभर कं टाळतात, मोबाईलमध्ये डोके  खुपसून वेळ काढण्याचे निमित्त शोधतात. त्याऐवजी वाचन,बैठय़ा खेळांद्वारे त्यांची करमणूक होऊ शके ल, हा उद्देश त्यामागे असल्याचे सांगण्यात आले.

टॉक शो, आरजेची धमाल

येथे रुग्णांचा योगासनांचा तास होतो. दिवसातून दोन वेळा डॉक्टर्स टॉक हा उपक्र म अलीकडे सुरू करण्यात आला. वीस मिनिटे तज्ञ डॉक्टर प्रतिकार शक्तीसह विविध विषयांवर रुग्णांना मार्गदर्शन करतात. दररोज एखादा वक्ता रुग्णांना प्रेरणादायी अनुभव, गोष्टी सांगतो. त्याशिवाय पोलीस दलातलेच दोन अंमलदार रेडीओ जॉकीप्रमाणे कथा, कविता, चुटकु ले, गाणी ऐकवून रुग्णांचे मनोरंजन करतात.