01 March 2021

News Flash

कंपनीची बस उलटून कर्मचारी ठार

तळोजा येथील आयजी पेट्रोल केमिकल कंपनीतील कामगारांना घेऊन जाणारी बस गुरुवारी सकाळी कल्याण येथील सूचकनाका येथे उलटली. यावेळी बसमधील एक कर्मचारी जोराचा मार लागल्याने जागीच

| May 10, 2013 03:41 am

तळोजा येथील आयजी पेट्रोल केमिकल कंपनीतील कामगारांना घेऊन जाणारी बस गुरुवारी सकाळी कल्याण येथील सूचकनाका येथे उलटली. यावेळी बसमधील एक कर्मचारी जोराचा मार लागल्याने जागीच मरण पावला. अन्य एक कर्मचारी जखमी झाला आहे. कंपनीच्या बसमध्ये सहा कर्मचारी होते. बस कल्याणहून तळोजा येथे जात असताना सूचकनाका येथे बस चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस उलटी झाली. कर्मचारी उन्नीकृष्णन मेनन (वय ५५, रा. राजभरनगर, चिंचपाडा) हा जागीच मरण पावला. राजेश पूरवार हा कर्मचारी जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 3:41 am

Web Title: employee dies in bus accident near taloja
Next Stories
1 आयकर भवनास आग
2 अनधिकृत बांधकामांतील रहिवाशांना पुनर्वसनाचा हक्कच नाही!
3 प्रणिती शिंदे यांचा राजकीय पट व्हिवा लाऊंजमधून आज उलगडणार
Just Now!
X