सरकारचा दावा

मुंबई : राज्यात करोनाचे संकट असतानाही मागील दीड वर्षात खासगी व सार्वजनिक कं पन्या, उद्योगांमध्ये सुमारे ३ लाख बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. कु शल उमेदवारांच्या शोधात असलेल्या ९१ हजार खासगी कं पन्यांनी या विभागाकडे नोंदणी के ली आहे.

देशात व राज्यात मार्च २०२० मध्ये करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी टाळेबंदी करावी लागली. त्याचा मोठा फटका उद्योग-व्यवसायाला बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गेल्यामुळे बेरोजगारी वाढली.  सरकारी नोकरभरती जवळपास बंद करण्यात आली. अशा परिस्थित कौशल्य विकास विभागामार्फत खासगी क्षेत्राशी समन्वय साधून विविध कं पन्या, उद्योग यांना हवे असलेल्या कु शल उमेदवारांची भरती करण्यासाठी काही उपक्रम राबविण्यास सुरुवात के ली. विभागाचे संके तस्थळ सुरू कण्यात आले. ऑनलाइन बेरोजगारांचे मेळावे घेण्यात आले. त्याच परिणाम म्हणून, मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ८३ बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मागील महिन्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना नोकऱ्या मिळ्याचे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योगही वेबपोर्टलवर नोंदणी करतात. त्यानुसार आतापर्यंत या विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर ९१ हजार ९१ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. त्यातून बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळत आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.