News Flash

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत

पोलीस महासंचालकांच्या मुख्यालयात तैनात

चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा करणारे चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. नऊ वर्षांपूर्वी त्यांना पोलीस दलातून निलंबित केले होते. त्यांनी पोलीस महासंचालकांच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता; तसेच बनावट चकमक प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.

शर्मा यांनी जवळपास ३१२ चकमकींमध्ये भाग घेतला होता. त्यांनी शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. दाऊदसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ‘डी’ कंपनीच्या इशाऱ्यावर ते काम करत होते, असाही आरोप होता.

नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. या प्रकरणात त्यांना २००८ मध्ये पोलीस सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चाही होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:54 pm

Web Title: encounter specialist pradeep sharma join maharashtra police
Next Stories
1 मुंबई: ९०० किलो टोमॅटो ‘गायब’ करणारा चोर गजाआड
2 अंधेरी-विरारदरम्यान ७ नव्या लोकल फेऱ्या 
3 १५ गोविंदा अजूनही रुग्णालयात
Just Now!
X