News Flash

“मुंबईतील ‘बत्तीगुल’मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य”, ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!

गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या बत्तीगुल प्रकरणामागे चीन असल्याचा दावा न्यूयॉर्क टाईम्समध्ये करण्यात आला असून त्यावर आता महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत

मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बत्तीगुल घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. या दाव्याला आता महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. “जेव्हा मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली, तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळीही मी ३ सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत, त्यात तथ्य आहे असं मला वाटतंय. सोमवारी संध्याकाळपर्यंत यावर सायबर सेल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल”, असं नितीन राऊत यांनी सांगितल्याचं एएनआयने म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या बत्तीगुलमागचं सत्य समोर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्सचं वृत्त समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर सेलला यासंदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

यानंतर आता सायबर सेलकडून गृहविभागाला सादर होणाऱ्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत आणि चीनमधले द्वीपक्षीय संबंध ताणले गेले होते. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवान प्रांतामध्ये भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. याच काळामध्ये १२ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अनेक भागांमधली वीज दिवसभरासाठी गायब झाली होती. काही भागांमध्ये तर थेट दुसऱ्या दिवशी वीज आली. ठाणे जिल्ह्यातल्या पडघा लोड डिस्पॅच सेंटरमध्ये ट्रिपिंग झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचं कारण समोर आलं होतं.

…म्हणून चीननेच सायबर हल्ला करुन मुंबईची बत्तीगुल केली; अमेरिकन कंपनीचा खळबळजनक दावा

दरम्यान, आता न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृतानुसार रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीने यासंदर्भातला सविस्तर ब्लॉग प्रकाशित केला आहे. यामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरच हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मालवेअरचा वापर करून मुंबईला वीजपुरवठा करणारी यंत्रणा हॅक करण्यात आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 6:21 pm

Web Title: energy minister nitin raut says reports on mumbai power cut may be true pmw 88
Next Stories
1 मुंबई : मोदींपाठोपाठ शरद पवारांनी घेतली करोनाची लस, म्हणाले “लस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी…”
2 डोळे बंद करून तरुणाने जे करून दाखवलं, त्यावर सचिन तेंडुलकरही झाला अचंबित
3 “हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी का करतात कळेना!”, अधिवेशनात नाना पटोलेंचा भाजपाला टोला!
Just Now!
X