27 November 2020

News Flash

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात

त्रुटी असलेल्यांच्या संलग्नतेबाबत विद्वत सभेत निर्णय होणार

त्रुटी असलेल्यांच्या संलग्नतेबाबत विद्वत सभेत निर्णय होणार
‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’च्या (एआयसीटीई) निकषांची पूर्तता न करणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची मुंबई विद्यापीठाच्या स्थानीय चौकशी समितीमार्फत (एलआयसी) कटोकोर तपासणी सुरू असून विद्यापीठाकडे आलेले अहवाल तज्ज्ञांची समिती नेमून तपासण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी सांगितले. यानंतर विद्यापीठाच्या विद्वत सभेकडे हे अहवाल पाठविण्यात येऊन तेथे त्यांच्या संलग्नतेबाबत निर्णय घेण्यात येईल. आवश्यक निकषांची पूर्तता न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे ‘एलआयसी’चे अहवाल विद्यापीठ वेबसाइटवर टाकण्यात येणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या स्थानीय चौकशी समितीकडे महाविद्यालय चौकशीसाठी प्रमाणित पद्धती नाही. मात्र तंत्रशिक्षण संचलनालय व एआयसीटीईचा अहवाल व निकषांचा विचार करून ‘एलआयसी’ने महाविद्यालयांकडे पुरेशी जागा, भोगवटा प्रमाणपत्र आहे का याची तसेच पायाभूत सुविधांची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिले होते. त्यातही ज्या महाविद्यालयांबाबत एआयसीटीई व डीटीईच्या चौकशीत त्रुटी आढळल्या त्यांचे प्राचार्य वा अध्यापकांना ‘एलआयसी’वर नियुक्ती दिलेली नाही. ‘एलआयसी’वर डीटीईचा प्रतिनिधी घ्यावा, असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्रालयाने देऊनही मुंबई विद्यापीठाने डीटीईचा प्रतिनिधी घेतला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 12:06 am

Web Title: engineering colleges inquiry report
Next Stories
1 विशेष मुलाच्या संगोपन रजेचा प्रश्न न्यायालयात
2 पंकज भुजबळ यांना २५ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश
3 ‘स्मार्ट सिटी’वर राज्य सरकारचा अंकुश
Just Now!
X