आपल्याकडील सोयीसुविधांविषयी खोटी माहिती पुरवून दिशाभूल करणाऱ्या राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्याना विविध शैक्षणिक कामापासून दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यपालांच्या आदेशावरून राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक व पायाभूत सुविधांची तपासणी केली होती. त्यात तब्बल ३४६ महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संचालनालयाने या सर्व महाविद्यालयांचे अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाला सादर केले असून त्यावर राज्य सरकार काय कारवाई करते याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी व शिक्षक संघटना आहेत.
मात्र, ही कारवाई करेपर्यंत या सर्व फसवणूक करणाऱ्या महाविद्यालयांच्या प्राचार्याना शैक्षणिक कामापासूनही दूर ठेवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे परभणी येथील खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 2, 2016 1:00 am