अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांच्या प्रवेशासाठीची संभाव्य (प्रोव्हिजनल) गुणवत्ता यादी शनिवारी राज्य तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आली. यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी एक लाख सहा हजार ८३३ अर्ज आले होते.
संभाव्य गुणवत्ता यादीमुळे विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमध्ये महाविद्यालयांची निवड करणे सोपे जाते. ही यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही तक्रार असतील तर ६ ते ८ जुलै या तीन दिवसांमध्ये ते तक्रार निवारण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून ९ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांचे पर्याय भरून घेण्याची प्रकिया ११ किंवा १२ जुलै पासून सुरु होईल अशी माहिती संचालनालयाचे संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली. दरम्यान १० जुलैपर्यंत ज्या नवीन महाविद्यालयांचे अर्ज येतील त्यांचा कॅप राऊंडमध्ये समावेश केला जाईल, असेही ते म्हणाले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेशासाठी अपात्र ठरविलेल्या १९ महाविद्यालयांच्या बाबतीत ११ जुलै रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे. शनिवारी यादी जाहीर झाली त्यावेळी विद्यार्थ्यांना लॉगइन करून त्यांचीच माहिती मिळत होती. यामुळे आपल्या इतकेच गुण मिळालेले किती विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत ही माहिती मिळू शकली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर