News Flash

पोलिसांच्या लाचखोरीच्या डायरीत नोंदी?

गिरगाव चौपाटीसमोरील एका सोशल क्लबवर छापा घालून एनआयएने शोधाशोध केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मुकेश अंबानी धमकी प्रकरण; एनआयएकडून तपास सुरू

मुंबई : दक्षिण मुंबईतील ‘सोशल क्लब’मधील धाडीत हाती लागलेल्या डायरीत मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत माहिती पुढे आल्याचा दावा ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’ने के ला आहे. डायरीत  रकमेसोबत काही पोलीस अधिकारी आणि विभागांच्याही नोंदी आढळल्या आहेत. हा हिशोब मुंबईतील विविध आस्थापनांकडून दरमहा येणाऱ्या हप्त्याचा असावा, असा संशय असून त्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग आणि आयकर विभागाला माहिती दिली जाईल, असेही एनआयएने स्पष्ट के ले आहे.

गिरगाव चौपाटीसमोरील एका सोशल क्लबवर छापा घालून एनआयएने शोधाशोध केली होती. तसेच उद्योगपती मुके श अंबानी धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या या गुन्ह्य़ांत वापर झालेल्या सीम कार्डबाबत हाती लागलेल्या माहितीची खातरजमाही के ली. या कारवाईत एनआयएच्या हाती क्लबचालकाने जपून ठेवलेली नोंदवही आढळली. त्यातून हा हिशोब समोर आला आहे. अतिरिक्त सॉलीसीटर जनरल अनील सिंग यांनी शनिवारी या डायरीचा हवाला देत वाझे यांनी मोठी रक्कम स्वीकारल्याचा दावा न्यायालयात के ला. या नोंदवहीत मुंबई पोलीस दलातील काही विभाग, अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. नावांसमोर रक्कम नमूद असून ती दरमहा स्वीकारलेल्या हप्त्याची असावी. या माहितीची शहानिशा के ली जाणार आहे, असे एनआयएतील सूत्रांनी स्पष्ट के ले.

याशिवाय वाझे यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीचे पारपत्र आढळले असून त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले. शनिवारी मध्यरात्री एनआयए पथकाने वाझे यांना अंधेरी परिसरात नेले. तेथे त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मनसुख हत्येपूर्वी वाझे आणि पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची या भागात बैठक झाल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे.

खात्याचाही तपास

वसरेवा येथील एका बँक शाखेत वाझे आणि अन्य व्यक्तीचे सामाईक खाते, लॉकर होते. वाझे यांच्या अटके नंतर या खात्यातून २६ लाख रुपये काढण्यात आले. हा व्यवहार कोणी, कोणाच्या सूचनेवरून के ला, याचाही तपास एनआयकडून  सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:35 am

Web Title: entries in the police bribery diary akp 94
Next Stories
1 ‘पोक्सो’अंतर्गत खटला वर्षभरात निकाली
2 ‘ना विकास क्षेत्रां’च्या संरक्षणात घट
3 किरकोळ बाजारात चिकन दर २२० ते २४० रुपयापर्यंत वाढले
Just Now!
X