मुंबईतील हाजीअली दर्ग्यात महिलांना असलेल्या प्रवेश बंदी विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील अंतिम सुनावणी मंगळवार २८ जून रोजी होणार आहे. हाजीअली दर्ग्यात सध्या एका विशिष्ट ठिकाणापर्यंतच महिलांना प्रवेश आहे. महिलांना असलेल्या प्रवेशबंदी विरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी अंतिम निर्णय २८ जून रोजी देणार असल्याचे जाहीर केले आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजीअली दर्ग्यात महिलांना असलेल्या प्रवेशबंदी विरोधात आंदोलन छेडले होते. तृप्ती देसाई यांच्या हाजीअली दर्ग्यातील प्रवेशावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. त्यामुळे आता २८ जून रोजी न्यायालय काय निर्णय देणार याकडे साऱयांचे लक्ष असणार आहे.