उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचे हाल

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : लोकल प्रवासाची मुभा नाही म्हणून खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दररोज प्रवासहाल होत असले तरी ज्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे, अशांचीही परिस्थिती काही फारशी वेगळी नाही. प्रवासीसंख्या वाढली तरी रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या न वाढल्याने कार्यालयीन वेळेत अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.

१५ जूनला मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालयातील काही मोजक्याच विभागांतील कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्रवासाची मुभा होती. त्या वेळी अडीच लाख प्रवासी संख्या असेल, असा विचार करत मध्य रेल्वेने २०० आणि पश्चिम रेल्वेने २०२ लोकल फे ऱ्यांचे नियोजन के ले. ३० जूनपर्यंत पश्चिम रेल्वेवर ८६,१६९ आणि मध्य रेल्वेवर ५४,१८७ प्रवासी संख्या होती. १ जुलैपासून अन्य काही शासकीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा दिली. म्हणून पश्चिम रेल्वेने आणखी १४८ आणि मध्य रेल्वेवर १५० फेऱ्या चालविण्याचे ठरविले. या दोन्ही मार्गावर प्रत्येकी ३५० लोकल फे ऱ्या धावत आहेत.

२ जुलैला पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या १ लाख तर मध्य रेल्वेवरील प्रवाशी संख्या ६४ हजार होती. सप्टेंबर महिन्यापासून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली. पश्चिम रेल्वेवरून १५ सप्टेंबरला २,२५,६९२ प्रवाशांनी लोकल प्रवास के ला, तर मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड लाखावर गेली आहे. तुलनेत लोकल फे ऱ्यांची संख्या तेवढीच आहे.

डोंबिवलीच्या दीप्ती माने सकाळी ९ वाजता सीएसएमटीला जाण्यासाठी लोकल पकडतात, परंतु प्रवासात प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. डब्यात प्रवासी एकमेकांना खेटून उभे असतात, असे त्यांनी सांगितले.

नियोजनाची हमी

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना याबाबत विचारले असता त्यांनी गरजेनुसार २०० फे ऱ्या वाढवून ३५० करण्यात आल्या. याशिवाय गर्दीच्या वेळेत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकल फे ऱ्यांची संख्याही जास्त ठेवली आहे, असे सांगितले. तर पश्चिम रेल्वेचे सुमीत ठाकू र यांनी वाढत जाणाऱ्या प्रवासी संख्येची माहिती घेतली जात असून पुढील आठवडय़ात फे ऱ्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजनही केले जाईल, अशी हमी दिली.

सप्टेंबरपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली. त्यामुळे प्रवासी वाढले. मात्र लोकल फे ऱ्यात वाढ झालेली नाही. भविष्यात प्रवासीसंख्या आणखी वाढण्याआधीच कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रयोग शासनाने करावा.

– लता अरगडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ