News Flash

अभय योजनेनंतरही पाणीपट्टी वसुली अत्यल्प

एकरकमी थकबाकी भरण्याची अट शिथिल

केवळ सात टक्के थकबाकीचा भरणा; एकरकमी थकबाकी भरण्याची अट शिथिल

मुंबई : अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या पाणीपट्टीची वसुली होऊन महसुलात भर पडावी म्हणून मुंबई महापालिकेने जाहीर केलेली अभय योजना अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. या योजनेला मुंबईकरांनी अत्यल्प प्रतिसाद दिला असून आतापर्यंत केवळ सात टक्के थकबाकी वसूल होऊ शकली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने संपूर्ण थकबाकी एकरकमी भरण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईकरांना पाणीपट्टीचे देयक पाठवल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत त्याचा भरणा करणे बंधनकारक आहे. यात विलंब झाल्यास अतिरिक्त रकमेची आकारणी करण्यात येते. मात्र, त्यानंतरही पाणीपट्टी थकबाकी वाढतच चालली आहे. त्यामुळे या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी २०२० पासून       ‘अभय योजना’ सुरू करण्यात आली होती. विशेष सूट मिळविण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० ही होती. नंतर स्थायी समितीने या योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली. मात्र तरीही या योजनेला नागरिकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पाणीपट्टीची थकबाकी आणि मलनिस्सारण आकाराचे संक लन करण्यासाठी अभय योजना राबविण्यात येते. दीर्घकाळापासून शासकीय व निमशासकीय जलजोडणीधारकांकडून प्रलंबित असलेली पालिके ची पाणीपट्टी वसूल करण्याचा त्यामागे हेतू असतो. अभय योजनेत थकीत पाणीपट्टीचे एकरकमी भरणा के ल्यास अतिरिक्त आकारात सूट देण्यात येते. मात्र यावर्षी अभय योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. करोनामुळे सर्वच स्तरांतील लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे एकरकमी थकीत पाणीपट्टी भरणे अनेकांना शक्य होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थकीत पाणीपट्टीचे एकरकमी अधिदान करण्याची अट शिथिल करण्याचे जल अभियंता विभागाने ठरवले आहे. जलदेयकनिहाय एकरकमी अधिदान के ल्यास त्यावरील अतिरिक्त आकार माफ करण्याचा निर्णय पालिके ने घेतला आहे. सर्वात जुन्या देयकाची प्रथम वसुली करण्यात येणार आहे.

२८१९.४४ कोटी रुपये थकबाकी

एका महिन्याच्या आत पाणीपट्टीची रक्कम न भरल्यास त्यावर २ टक्के  अतिरिक्त आकारणी केली जाते. आतापर्यंत पाणीपट्टीची २८१९.४४ कोटींची रक्कम थकबाकी आहे. मात्र थकीत रकमेच्या तुलनेत अभय योजनेनुसार के वळ १९३.४२ कोटी म्हणजेच ६.८६ टक्के च वसुली होऊ शकली आहे. पाणीपट्टीच्या वसुलीसाठी राज्य, कें द्र सरकारी व निम्न सरकारी आस्थापनांशी संपर्क साधण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अभय योजना वर्ष       कालावधी वसूल रक्कम (कोटी)     टक्के वारी

२०१०-११               १२३ दिवस                        २४६.०४           ३१.४४ टक्के

२०१४-१५               १५९ दिवस                        २३४.९७          २०.९६ टक्के

१५-२-२०२० ते ३०-११-२०२०  २८९ दिवस         १९३.४२          ६.८६ टक्के

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:23 am

Web Title: even after abhay yojana water bill recovery is very low zws 70
Next Stories
1 शहरबात : हक्काच्या शिक्षणाची जाणीव..
2 राखीव जागांची प्रवेश प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून
3 शिक्षकांचे तंत्रकौशल्य वाढवण्यासाठी स्वतंत्र संस्था
Just Now!
X