News Flash

पोलीस नाईक रेहाना शेख यांचे सर्वत्र कौतुक

रेहाना यांचे पोलीस दलातून कौतुक झाले.

मुंबई : नोकरी, संसार सांभाळून असंख्य करोनाबाधितांच्या मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस नाईक रेहाना शेख यांचे पोलीस दलातून कौतुक सुरू आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देत रेहाना यांच्या कार्याचा सन्मान केला. गेल्या आठवड्यात पोलीस उपायुक्त (सायबर) डॉ. रश्मी करंदीकर यांनी रेहाना यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी परिसंवाद आयोजित के ला होता.

करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रेहाना यांनी जनसंपर्काचा वापर करत, वेळ काळ न पाहता अनेक करोनाबाधितांना रक्तद्रव (प्लाझ्मा), रक्तद्रव दाते, रक्त, उपचारांत आवश्यक ती औषधे, खाटा उपलब्ध करून देण्यासाठी धडपड केली. मुंबई, महानगर प्रदेशच नव्हे तर पुणे, सातारा, नाशिक, नागपूरपर्यंत पोलीस, त्यांचे कु टुंबीय आणि त्यांच्या परिचित बाधितांना आवश्यक ते उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याची दखल ‘लोकसत्ता’ने ‘पीड पराये जाने रे’ या सदराद्वारे घेतली. त्यानंतर रेहाना यांचे पोलीस दलातून कौतुक झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:12 am

Web Title: everybody appreciates police naik rehana sheikh akp 94
Next Stories
1 लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी कायम
2 विभागीय शुल्क समित्या स्थापन, मात्र पालकांना दिलासा नाहीच!
3 अनिल देशमुखांवरील गुन्हा  : प्रकरण अन्य खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी मागे
Just Now!
X