News Flash

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

नवी मुंबई व मुंबई परिसरातील विविध कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा मुलगा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

गांधी भवन येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात नवी मुंबई, एरोली, डोंबिवली, माढा येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, आ. वजाहत मिर्झा, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, संजय लाखे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सेलचे प्रदीप वर्तक आदी मान्यवरही उपस्थित होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 6:52 pm

Web Title: ex mayor madan bhargad enters into congress sbi 84
Next Stories
1 “मुंबईतील ‘बत्तीगुल’मागे चीन असल्याच्या दाव्यात तथ्य”, ऊर्जा मंत्र्यांचं मोठं विधान!
2 मुंबई : मोदींपाठोपाठ शरद पवारांनी घेतली करोनाची लस, म्हणाले “लस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी…”
3 डोळे बंद करून तरुणाने जे करून दाखवलं, त्यावर सचिन तेंडुलकरही झाला अचंबित
Just Now!
X