05 December 2020

News Flash

माजी सैनिकांना घरपट्टी, मालमत्ता कर माफी

ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद

(संग्रहित छायाचित्र)

माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफ करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. ग्रामविकास विभागानेदेखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे. मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करून त्याला ‘मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 12:32 am

Web Title: ex servicemen get property tax exemption abn 97
Next Stories
1 उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकासकांना सवलती
2 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे वर्ष सुरू करण्याची मुदत चुकणार?
3 मराठा आरक्षणासाठी सामर्थ्यांनिशी लढा -मुख्यमंत्री
Just Now!
X