13 August 2020

News Flash

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार दादर वाचनालयाला

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

दादर सार्वजनिक  वाचनालय आणि काशीनाथ धुरू हॉल ट्रस्ट यांना यंदाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांच्यासाठी २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ या वर्षांंसाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा बुधवारी पार पडला. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ट ग्रंथालये म्हणून तीन वर्षांतील एकूण १८ ग्रंथालयांना, उत्कृष्ट कार्यकर्ते म्हणून १६ जणांना तर उत्कृष्ट सेवक किंवा कर्मचारी म्हणून १५ जणांना गौरवण्यात आले.

‘‘ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असल्याने समाज माध्यमांचा वाढता वापर आणि बदललेल्या जीवनशैलीतही ग्रंथालयांचे महत्त्व टिकून आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच ग्रंथालय संचालनालयाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे’’, असे विनोद तावडे म्हणाले. या सोहळ्याला विधान परिषद सदस्य हरिभाऊ  राठोड, ग्रंथालय प्र. संचालक सुभाष राठोड, आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार २०१६-१७

शहरी विभाग

मिरज विद्यार्थी संघ, सांगली- अ वर्ग पुरस्कार

मंगलमूर्ती सार्वजनिक वाचनालय, यवतमाळ – ब वर्ग पुरस्कार

स्वर्गीय कमळाबाई निवृत्ती गिते सार्वजनिक वाचनालयाल, नाशिक – ड वर्ग पुरस्कार

ग्रामीण विभाग

सार्वजनिक वाचनालय, भिलवडी, सांगली – ब वर्ग पुरस्कार

जयंत सार्वजनिक वाचनालय, सांगली – क वर्ग पुरस्कार

श्री विश्वेश्वर नाथबाबा सार्वजनिक वाचनालय, अहमदनगर – ड वर्ग पुरस्कार

२०१७-१८ चे पुरस्कार

शहरी विभाग

करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर – अ वर्ग पुरस्कार

दिपा निसळ सार्वजनिक वाचनालय, अहमदनगर – ब वर्ग पुरस्कार

यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय, नाशिक –  ड वर्ग पुरस्कार

ग्रामीण विभाग

अनुसया सार्वजनिक वाचनालय, परभणी – ब वर्ग पुरस्कार

संत योगानंद सार्वजनिक वाचनालय, जालना – ब वर्ग पुरस्कार

शिरळ वाचनालय, रत्नागिरी – क वर्ग पुरस्कार

२०१८-१९ चे पुरस्कार

शहरी विभाग

दादर सार्वजनिक वाचनालय,मुंबई व काशिनाथ धुरु हॉल ट्रस्ट, मुंबई – अ वर्ग पुरस्कार

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई – ब वर्ग पुरस्कार

स्व. किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय, यवतमाळ – ड वर्ग पुरस्कार

ग्रामीण विभाग

वीर सावरकर सार्वजनिक  वाचनालय, बुलढाणा – ब वर्ग पुरस्कार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फु ले सार्वजनिक वाचनालय, अमरावती – क वर्ग पुरस्कार

कमलानंद सार्वजनिक वाचनालय, अमरावती – ड वर्ग पुरस्कार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:42 am

Web Title: excellent public library award to dadar library abn 97
Next Stories
1 “आरेच्या झाडांना ‘प्रीती’ची फळं लावू नका”, आदित्य ठाकरेंवरच्या टीकेला सेनेचे उत्तर
2 आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू, आपच्या प्रीती मेनन यांची बोचरी टीका
3 कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आग
Just Now!
X