करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले असले तरी काही घटकांना सूट देण्यात आली आहे. घरकाम करणारे, स्वयंपाकी, परीक्षार्थी, वाहन चालकांना रात्री ८ नंतर तसेच शनिवार व रविवार संपूर्ण टाळेबंदीच्या काळात ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे, विमान प्रवासास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या वतीने सोमवारी रात्री नवा आदेश लागू करण्यात आली. घरकाम करणारे, स्वयंपाकी, कामगार, वाहनचालक यांना सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार या सर्व वर्गाना सवलत देण्यात आली आहे. रात्री 8 नंतर संचारबंदीच्या काळात तसेच शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदीच्या काळात कामगार, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना ये-जा करता येईल. यासाठी परिस्थितीनीरुप निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आले आहे.
खासगी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ नंतर तसेच शनिवार व रविवार खासगी बसेस किंवा खासगी वाहनांमधून प्रवास करता येईल. रेल्वे, बस किंवा विमानाने रात्री ८ नंतर आगमन होणाऱ्या किं वा शनिवार व रविवारी येणाऱ्या प्रवाशांना घरी जाता येईल. यासाठी प्रवासाचे तिकीट त्यांच्याबरोबर असणे बंधनकारक असेल. या निर्णयामुळे रात्री उशिरा येणाऱ्यांना स्थानकांवर तत राहावे लागणार नाही. परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यानाही रात्री ८ नंतर व शनिवार व रविवारच्या बंदीतून सूट देण्यात आली आहे. यासाठी परीक्षेचे हॉल तिकीट बाळगणे आवश्यक असेल.
धार्मिकस्थळे बंद असली तरी विवाह किं वा अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जाईल. विवाह समारंभ शनिवारी किंवा रविवारी असल्यास नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी दिली जाईल. पेट्रोलपंपावरील कर्मचारी, कार्गो सेवा, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते यांचा आवश्यक सेवेत प्रवेश करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्बंधातून सूट मिळाली आहे. सेबी, स्टॉक मार्के ट, सर्व वित्तीय सेवा, मायक्रो फायनान्स, वकिलांची कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ र्पयत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
‘२५ वर्षावरील सर्वाना लस द्या’
करोनाचा संसर्ग तरुण पिढीला मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने २५ वर्षावरील सर्वाना करोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. केंद्राने दीड कोटी जादा लशी दिल्यास मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या सर्वाधिक संसर्ग झालेल्या जिल्ह्य़ांमधील ४५ वर्षावरील साऱ्यांचे लसीकरण तीन आठवडय़ांत पूर्ण केला जाईल, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात योजण्यात आलेल्या उपायांची माहिती देण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 1:22 am