News Flash

नोकरभरतीवरील बंदीतून अनुकंपा तत्त्वावरील भरतीला सूट

वित्त विभागाने या संदर्भात ४ मे रोजी एक आदेश काढून २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींना ६७ टक्के कात्री लावावी लागली.

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरतीवरील बंदीतून आता अनुकंपा तत्त्वावरील भरतीला वगळण्यात आले आहे. वित्त विभागाने गुरुवारी तसा सुधारित आदेश जारी केला आहे.

टाळेबंदीमुळे उद्योग, व्यवसाय बंद झाल्याने, राज्याला मिळणारा महसूल ठप्प झाला. त्यामुळे खर्चात मोठय़ा प्रमाणावर कपात करावी लागली. वित्त विभागाने या संदर्भात ४ मे रोजी एक आदेश काढून २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदींना ६७ टक्के कात्री लावावी लागली. फक्त ३३ टक्के निधी वितरित केला जाईल व त्यानुसार सर्व विभागांनी आपले चालू आर्थिक वर्षांचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

करोनामुळे निर्माण झालेल्या बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी २०२०-२१ मध्ये कोणतीही नवीन योजना सुरू करू नये, सध्याच्या योजांमधील काही योजना प्रलंबित ठेवाव्यात, तर काही योजना रद्द कराव्यात, असेही सर्व विभागांना कळविण्यात आले होते. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये हे विभाग वगळता इतर कोणत्याही विभागात नोकरभरती करून नये, असे सक्त र्निबध घालण्यात आले होते. मात्र त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे राज्य सरकारचे अनुकंपा धोरण आहे. अशा प्रकारच्या अनुकंपा तत्त्वावरील भरतीला आता परवानगी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:08 am

Web Title: exemption on compassionate recruitment from ban on government recruitment abn 97
Next Stories
1 तत्कालीन फडणवीस सरकारने आणलेली आणखी एक योजना ठाकरे सरकारकडून रद्द
2 रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
3 अग्रिमा जोशुआ प्रकरण : बलात्काराची धमकी देणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांकडून अटक
Just Now!
X