News Flash

महाराष्ट्राची करारांत आघाडी

‘मेक इन इंडिया’मध्ये गुंतवणुकीत निम्मा वाटा; अंमलबजावणीसाठी ‘स्वतंत्र कृतिगट’

‘मेक इन इंडिया’मध्ये गुंतवणुकीत निम्मा वाटा; अंमलबजावणीसाठी ‘स्वतंत्र कृतिगट’
‘मेक इन इंडिया’ सप्ताहामध्ये देशभरात सुमारे १५ लाख २० हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी प्रस्ताव आले असताना महाराष्ट्राने बाजी मारत त्यापैकी निम्मे म्हणजे सुमारे आठ लाख कोटी रुपये इतक्या विक्रमी गुंतवणुकीसाठीचे सामंजस्य करार केले. आतापर्यंत सामंजस्य करारातून प्रत्यक्ष गुंतवणूक होण्याचे प्रमाण केवळ २० टक्के आहे. त्यामुळे या करारांच्या पाठपुराव्यासाठी उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली स्वतंत्र कृतिगट स्थापण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या समारोप समारंभात गुरुवारी केली.
महाराष्ट्राने केलेल्या करारांमुळे सुमारे ३० लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ातही गुंतवणूक येणार असून सर्वाधिक गुंतवणूक किरकोळ क्षेत्रात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किरकोळ क्षेत्राबरोबरच बांधकाम, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, पर्यटन, कौशल्यविकास आदी क्षेत्रांमध्ये हे सामंजस्य करार झाले आहेत.
आशियातील सर्वात मोठय़ा आर्थिक महोत्सवाचे आयोजन करून देशाची व राज्याची ताकद जगाला दाखविली, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रात उद्योगपूरक वातावरण असून जमीन विनासायास उपलब्ध व्हावी, यासाठी पावले टाकली आहेत. त्यांना एक चटईक्षेत्र निर्देशांक देऊन वीजदराच्या योजनांमधून काही सवलती दिल्या आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. अमेरिकन उच्चायुक्तांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास रस दाखविला असून आणखी ३० कंपन्यांनीही रस दाखविला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Untitled-36

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 2:14 am

Web Title: expected to produce 30 million jobs in maharashtra after make in maharashtra
टॅग : Make In Maharashtra
Next Stories
1 दिल्ली नव्हे, मुंबईच प्रदूषणाची राजधानी!
2 खय्याम यांच्याकडून १० कोटींची संपत्ती दान
3 कार्यकर्त्यांच्या फलकबाजीचा आशीष शेलार यांना फटका!
Just Now!
X