मायदेशी परतलेल्या १९ हजार प्रवाशांना पालिकेची मदत

मुंबई : करोनाकाळात परदेशात अडकू न पडलेल्या नागरिकांसाठी के ंद्र सरकारने राबवलेल्या ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना विलगीकरण काळात दिलेला चहा-न्याहारी, जेवणापोटी महापालिके ला ५२ लाख रुपये खर्च आला आहे. सुमारे चार महिन्यांत १९,३२७ जणांच्या दोन वेळच्या जेवणासाठी ५२ लाख ७६ हजार रुपये इतका खर्च झाला आहे.

करोना विषाणू प्रतिबंधासाठी जगभरात के लेल्या टाळेबंदीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत भारतात परत आणण्यात आले होते. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करून विशेष विमानांनी परत येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरणात ठेवण्यात आले होते. इतर जिल्ह्य़ातील व राज्यांतील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्यात आले होते, तर ज्या राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त झाले नाहीत अशा प्रवाशांना मुंबईत अलगीकरणात ठेवण्यात येत होते. मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांनाही संस्थात्मक अलगीकरणात ठेवले जात होते. संस्थात्मक अलगीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले होते. या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात येत होते. तर पुढील सात दिवस निवासस्थानी विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात येत होते.

टाळेबंदीच्या काळात पालिके ने बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील मुंबईत अडकलेले कामगार आदींना पालिके कडून जेवणाचा पुरवठा करण्यात येत होता. खाद्यपदार्थाची पाकिटे तयार करून देण्यासाठी काही संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. याच संस्थांमार्फत विमानतळावरील प्रवाशांसाठी जूननंतर जेवणाची सोय करण्यात आली होती. गेल्या वर्षी १० मेपासून या अभियानाला सुरुवात झाली होती. मात्र ६ जूनपासून या प्रवाशांनाही पालिके ने जेवण देण्यास सुरुवात के ली. ५ जून ते ३ ऑक्टोबर या कालावधीतील जेवणाच्या खर्चाचा तपशील नियोजन विभागाने स्थायी समितीच्या पटलावर कार्योत्तर मंजुरीसाठी सादर के ला आहे.

प्रतिदिन प्रति प्रवाशासाठी सकाळी चहा व न्याहारी, दुपारी व रात्रीचे जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी व गोड पदार्थ, खिचडी), संध्याकाळी चहा, बिस्किटे तसेच बाटलीबंद पिण्याचे पाणी आदी देण्यात आले होते. प्रतिमाणशी २६० रुपये याप्रमाणे १९,३२७ जणांसाठी सर्व करांसह ५२ लाख ७६ हजार, २७१ रुपये खर्च पालिके ला आला.