: करोना संसर्गामुळे खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णांचा रेमडेसिविर इंजेक्शनवरील खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. त्यासाठी राज्यभरातील प्रकल्प अधिकाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी दिली.

आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी आदिवासी विकास विभागातर्फे १७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मदतीसाठी निकष

१. रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा व त्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे.

२. संबंधित खासगी रुग्णालय हे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत नसावे.

३. आदिम जमाती / दारिद्र्यरेषेखालील/विधवा/अपंग/ परित्यक्ता निराधार महिला यांचा प्राधान्याने विचार

४. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी खर्च करताना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास यांना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागेल.