News Flash

जम्बो करोना केंद्रांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

डॉक्टरांनी दूरध्वनीवरून जम्बो करोना केंद्रात सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

११ खासगी रुग्णालयांतील ३५ डॉक्टरांची मदत

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जम्बो करोना केंद्रांमधील रुग्णांवर उत्तम प्रकारे उपचार व्हावेत यासाठी ११ खासगी रुग्णालयांमधील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात येणार असून हे डॉक्टर दूरध्वनीवरून सल्लागार स्वरूपात जम्बो करोना केंद्रांना सेवा देणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार या केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्टरांशी सल्लामसलत करणार आहेत.

करोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी पालिकेने भायखळा, एनएससीआय-वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, नेस्को-गोरेगाव, मुलुंड आणि दहिसर येथे जम्बो करोना केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये सात हजार ६५० रुग्णशय्या असून तिथे सुमारे एक हजार ४६६ कर्मचारी कार्यरत आहेत. केईएम, नायर, शीव आदी प्रमुख रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, कक्ष परिचर (वॉर्डबॉय) आदींचा समावेश आहे. या केंद्रांमध्ये दाखल रुग्णांना उत्तम उपचार मिळावेत यासाठी पालिका प्रयत्नशील होती. त्यासाठी मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांची संपर्क साधण्यात येत होता. मुंबईतील ११ मोठ्या रुग्णालयांतील ३५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून पालिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या डॉक्टरांनी दूरध्वनीवरून जम्बो करोना केंद्रात सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिाम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिली.

भायखळा येथील रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास कंपनीच्या आवारातील जम्बो करोना केंद्रात दाखल रुग्णांसाठी जसलोक रुग्णालयातील दोन, तर भाटिया रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्लागार स्वरूपात सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे.  एनएससीआयमधील जम्बो करोना केंद्रात बॉम्बे रुग्णालय आणि ब्रिच कॅण्डी रुग्णालयातील अनुक्रमे पाच व तीन तज्ज्ञ डॉक्टर, वांद्रे – कुर्ला संकुलातील जम्बो करोना केंद्रात लीलावती आणि हिंदुजा रुग्णालयातील अनुक्रमे तीन व चार तज्ज्ञ डॉक्टर सल्लागार स्वरूपात सेवा देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:54 am

Web Title: expert guidance jumbo corona center akp 94
Next Stories
1 पावसाने दडी मारल्याने मोडकसागर तलावातील जलपातळीत घट
2 खातेधारकांची घुसमट
3 ‘दंड न भरल्याची शिक्षा ही गुन्ह्याची शिक्षा नव्हे’
Just Now!
X