30 May 2020

News Flash

वीजदरांवरून तज्ज्ञांचे टीकास्त्र, तर भाजप श्रेयासाठी सरसावला

भाजप सरकारच्या पाच वर्षांतील कामगिरीमुळे वीजदरात कपात झाल्याचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

महावितरणच्या वीजदरात सरासरी ७ टक्के  कपात झाल्याचा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा दावा खोडून काढताना वीजतज्ज्ञांनी प्रत्यक्षात महावितरणच्या सरासरी देयक दरात ६.७ टक्के  असल्याचे सांगत आयोग ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे. तर भाजप सरकारच्या पाच वर्षांतील कामगिरीमुळे वीजदरात कपात झाल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी के ला.

फेब्रुवारी २०२० चा इंधन समायोजन आकार १.०५ रु प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट करत देयक दर ७.९० रुपयांवरून ७.३१ रु प्रति युनिट वर आणला व दरकपात केली अशी आकडय़ांची चलाखी वीज आयोगाने दाखवली आहे. प्रत्यक्षात सरासरी देयक दर ६.८५ रु प्रति युनिट वरून ७.३१ रु प्रति युनिट इतका वाढला आहे. ही दरवाढ ४६ पैसे प्रति युनिट म्हणजे सरासरी ६.७% होते. आयोगासारख्या न्यायालयीन संस्थेने हे स्पष्टपणे जाहीर करणे आवश्यक होते. आयोगाने कपातीचा मुखवटा वापरणे योग्य नाही, अशी टीका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी के ली.

वीज आयोगाने महावितरणच्या ग्राहकांसाठी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात निश्चित केलेले दर व आता एप्रिल २०२० पासून लागू होणारे दर यांची तुलना केली तर ही दरवाढ स्पष्टपणे सरासरी ६.७% आहे. तसेच राज्यातील सर्वच ग्राहकांच्या स्थिर व मागणी आकारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. घरगुतीसह इतर लघुदाब ग्राहकांचा वहन आकार १.२८ रु प्रति युनिट वरून १.४५ रुपये प्रति युनिट इतका वाढवला, याकडे होगाडे यांनी लक्ष वेधले.

हे भाजप सरकारचे श्रेय – बावनकुळे

गेल्या ५ वर्षांत भाजप सरकारने ऊर्जा खात्याच्या भांडवली खर्चात के लेली कपात आणि निरनिराळ्या बचतीतूनच वीजदर कमी करणे शक्य झाले आहे, हेही त्या आदेशात नमूद असल्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. वीज दर कमी करण्याबाबतची याचिका आयोगाकडे भाजपा सरकारच्या काळातच दाखल करण्यात आली होती आणि २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीतील कामगिरीचे मूल्यमापन करून आयोगाने हा निर्णय दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:46 am

Web Title: experts comment on electricity tariffs while the bjp has gone for credit abn 97
Next Stories
1 अर्थसंकल्पात आरोग्य खात्याला दुय्यमच स्थान
2 करोनामुळे मुख्यमंत्र्यांवर आणखी एक संकट!
3 राज्यात करोना बाधित ८८ नवीन रुग्णांची नोंद
Just Now!
X