News Flash

एक्स्प्रेस खाद्य महोत्सवाला आजपासून सुरुवात

योजनेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांच्या कूपनमधून सोडत पद्धतीने रोज विजेत्यांची निवड केली जाणार आहे.

खाद्यप्रेमींना जिभेच्या चोचले पुरवण्यासोबत भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी मिळवून देण्यासाठी लोकसत्तातर्फे रिसो राइसब्रॅन ऑईल प्रस्तुत ‘एक्स्प्रेस खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. आवडता पदार्थ पोटभर खाल्यानंतर केवळ ढेकर न देता खवय्यांना कार, परदेशी सहल, फ्रीज, वातानुकूलित यंत्र आदी बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही योजना २४ डिसेंबर ते १० जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
खवय्यांनी खेरदी केलेल्या किंवा त्या ठिकाणी बसून फस्त केलेल्या २५० रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या खाद्यपदार्थावर त्यांना एक ‘कूपन’ दिले जाणार आहे. ग्राहकांनी हे कूपन भरून त्याच खाद्य दुकानातील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये जमा करायचे आहे.
योजनेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांच्या कूपनमधून सोडत पद्धतीने रोज विजेत्यांची निवड केली जाणार आहे. ही सर्व नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील. याशिवाय आठवडय़ाच्या भाग्यवान विजेत्यांची नावेही अशाच्या प्रकारे जाहीर केली जातील. याबाबतची नियमावली लोकसत्तामधून प्रसिद्ध केली जाईल. शेवटच्या दिवशी शिल्लक कूपन्समधून त्यातून सोडत पद्धतीने अंतिम विजेत्याची निवड केली जाईल.

प्रस्तुती : रिसो राइसब्रॅन ऑइल
पॉवर्डबाय : तन्वी, पितांबरी, गुणाजी इंटरप्रायझेस
ट्रॅव्हल्स पार्टनर : केसरी
गिफ्ट पार्टनर : विलपॉवर, साईनिर्णय, एलडी घोडके सराफ,
विष्णूजी की रसोई
गोल्ड पार्टनर : अनंत हलवाई, टिप टॉप प्लाझा, जी४
सिल्वर पार्टनर : फिशलँड, मासोळी, प्रशांत कॉर्नर
हॉस्पिटॅलिटी पार्टनर : रॉयल चॅलेंज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:29 am

Web Title: express food festival start today
Next Stories
1 मुंबई कुडकुडली..!
2 मुंबईत रेडी रेकनर दरात सरसकट वाढ नाही!
3 गेल्या वर्षी १५ टक्के शुल्कवाढ केलेल्या शाळांना यंदा वाढ नाही!
Just Now!
X