मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे सामान्य प्रवाशांसाठीही १ फेब्रुवारीपासून खुली होत आहे. त्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली, त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती पश्चिम व मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
२४ मार्च २०२० पासून उपनगरीय रेल्वे सेवा बंद झाली. त्याआधी ज्या प्रवाशांना लोकलचे एक महिना, तीन महिने, सहा महिने व वर्षभराचे पास काढले होते अशा प्रवाशांच्या पासची मुदत टाळेबंदीत संपली. यात अनेकांनी द्वितीय श्रेणीबरोबरच प्रथम श्रेणीचेही, तर काहींनी वातानुकू लित लोकलचे पास काढले होते. सेवा बंद असल्याने सामान्य प्रवाशांनी काढलेल्या पासना मुदतवाढ मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू होताच प्रथम त्या प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ज्या प्रवाशांच्या पासची मुदत करोनाकाळात संपली व लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांना मुदतवाढ मिळू शकली नाही, अशा प्रवाशांच्या पासला येत्या सोमवारपासून मुदतवाढ मिळेल. तसे आदेशच आहेत.
…तेवढी मुदतवाढ
टाळेबंदीमुळे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट के ले. तर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनीही प्रवाशांना पासला मुदतवाढ ही सोमवारपासूनच मिळणार असल्याचे सांगितले.
वाशी येथे एका खासगी कंपनीत कामाला असून मी रेल्वेने प्रवास करतो. १३ फेब्रुवारी २०२० मध्येच मी सहा महिन्यांचा रेल्वे पास काढला होता. त्यानंतर महिन्याभरातच करोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे सेवा बंद झाली. आता रेल्वे सेवा सुरू झाल्याने माझ्या जुन्या पासला मुदतवाढ देऊन प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे. – विनीत भालेकर, प्रवासी, ठाणे.
मी करोनाकाळापूर्वी विक्रोळी येथे कामाला जात होतो. मार्च महिन्यात मी तीन महिन्यांचा रेल्वेपास काढला होता. मात्र, काही दिवसांतच रेल्वेसेवा अचानक बंद झाली. – प्रीतम शेवाळे, प्रवासी, ठाणे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 1:42 am