News Flash

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल; १५ कोटींचं प्रकरण

extortion case Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह. (संग्रहित छायाचित्र)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याही अडचणी वाढताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये डीसीपी अकबर पठाण यांचंही नाव आहे.

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यापासून परमबीर सिंह सातत्याने चर्चेत आहेत. उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. तेव्हापासून सिंह सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत. दरम्यान, आता सिंह यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना आमदाराच्या भावाला अटक!

दरम्यान, या प्रकरणी संजय पुनमिया आणि सुनील जैन अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी संजय पुनमिया हे मिरा-भाईंदरमधील शिवसेना आमदार गीता जैन यांचे भाऊ आहेत. याप्रकरणी तक्रार करणारे श्यामसुंदर अगरवाल हे युएलसी घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे यूएलसी घोटाळ्यापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप या व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६७, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:24 pm

Web Title: extortion case param bir singh former mumbai police commissioner extortion case registered against param bir singh bmh 90
टॅग : Mumbai News
Next Stories
1 अटकेनंतर राज कुंद्रांनी पहिल्यांदाच न्यायालयासमोर मांडली भूमिका, म्हणाले, “तो कंटेट पॉर्न नाही तर…”
2 कसारा घाटात दरड कोसळली! रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ ट्रेन करण्यात आल्या रद्द
3 Mumbai Rain : रेल्वे रुळांवरच नाही थेट प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत साचलं पाणी; त्र्यंबकेश्वरमध्येही रस्त्यांच्या झाल्या नद्या