News Flash

आत्महत्येपूर्वीची नेत्रदानाची इच्छा अपूर्णच!

कांदिवली येथे एका तरूण व्यावसायिकाने गुरुवारी रात्री घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्याच्या मृत्यूबाबत

| February 25, 2013 02:37 am

कांदिवली येथे एका तरूण व्यावसायिकाने गुरुवारी रात्री घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु त्याच्या मृत्यूबाबत उशीरा माहिती मिळाल्याने ती अपूर्णच राहिली आहे.
कांदिवलीच्या महात्मा गांधी रोडवरील कमला नगर येथे राहणाऱ्या दिलीप अमिनवी (३२) याचा हार्डवेअरचा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यात आर्थिक नुकसान झाल्याने दिलीप निराश होता. गेल्याच वर्षी त्याचे लग्न झाले होते. गुरुवारी रात्री घरात पत्नी झोपलेली असताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी सातच्या सुमारास त्याच्या पत्नीला दिलीपचा मृतदेह दिसला. आत्महत्येपूर्वी दिलीपने लिहिलेली चिठ्ठी तिला सापडली. त्यात त्याने नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती़  परंतु त्याने आत्महत्या करून ८-९ तास झाले होते. मृत्यूनंतर केवळ चार तासातच डोळे नेत्रदानासाठी काढता येतात. त्यामुळे दिलीपची ही इच्छा अपूर्णच राहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:37 am

Web Title: eye donation wish is incomplete before suicide
टॅग : Eye Donation
Next Stories
1 दलितांवरील अत्याचारांचा वाढता आलेख
2 मुख्यमंत्र्यांच्या नाराजीमुळे एमएसआरडीसी संकटात!
3 प्रकल्पग्रस्तांतर्फे दुष्काळग्रस्तांना ५० हजारांची मदत
Just Now!
X