जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्कींग संकेतस्थळ असलेल्या ‘फेसबुक’ची सेवा मंगळवारी सकाळी तब्बल ४५ मिनिटे खंडीत झाली होती. फेसबुकसोबत ‘इन्स्टाग्राम’ हे मोबाईल फोटो अॅपही काम करत नसल्याने युजर्सचा चांगला गोधळ उडाला. दरम्यान, काही वेळापुर्वी ‘फेसबुक’ व ‘इन्स्टाग्राम’ची सेवा पुर्ववतपणे सुरू झाली आहे.
फेसबुकची सेवा नेमकी कशामुळे खंडीत झाली याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. तसेच फेसबुकचीच सेवा असलेल्या ‘व्हॉट्स अॅप’ या मोबाईल मेसेजिंग अॅपची सुविधा सुरळीतपणे सुरू होती.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारे फेसबुकची सेवा दोनदा खंडीत झाली होती.