18 January 2018

News Flash

फेसबुक प्रकरण: पालघरमधील त्या दोन मुलींवरील खटला कोर्टाकडून बंद

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत उत्स्फूर्तपणे पाळला गेलेल्या बंदविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया लिहिणाऱया दोन मुलींविरुद्धचा खटला पालघर न्यायालयाने बंद केला.

ठाणे | Updated: February 1, 2013 1:20 AM

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मुंबईत उत्स्फूर्तपणे पाळला गेलेल्या बंदविरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया लिहिणाऱया दोन मुलींविरुद्धचा खटला पालघर न्यायालयाने बंद केला.
शाहीन धाडा आणि रिनू श्रीनिवासन या दोन मुलींविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतल्याचा अहवाल पोलिसांनी पालघर न्यायालयापुढे गुरुवारी सादर केला. त्यानंतर न्यायालयाने हा खटला बंद करण्याचा निर्णय घेतला.
या दोन्ही मुलींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा ‘बरोबर नाही आणि चुकीचाही नाही’ या शब्दांत पोलिसांनी आपला क्लोजर रिपोर्टमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये नोंद केली होती.
दरम्यान, या मुलींच्याविरोधात तक्रार दाखल करणारे शिवसेनेचे सदस्य भूषण संखे यांनी न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

First Published on February 1, 2013 1:20 am

Web Title: facebook issue court closes case against palghar girls
  1. No Comments.