टाळेबंदीच्या काळात न्यायालयांमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या प्रकरणांच्या सुनावण्या दूरचित्रसंवाद (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमाद्वारे घेण्यात येत आहेत. मात्र या सुनावणीत केवळ न्यायमूर्ती, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांचे वकील यांच्याशिवाय अन्य कोणासही सहभागी होता येत नव्हते. परंतु आज गुरुवारपासून ‘झूम अ‍ॅप’च्या माध्यमातून ही सुनावणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे.

उच्च न्यायालयात १ एप्रिलपासून तातडीची प्रकरणे दररोज दूरचित्रसंवादाद्वारे ऐकली जात आहेत. परंतु न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी ९ एप्रिलपासून या सुनावणीत लोकांनाही सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

भाग घेण्यासाठी..

ज्यांना ही सुनावणी ऐकायची आहे. त्यांना दुपारी १२ वाजता  https://zoom.us/j/usxtsstvv, meeting ID: usxtsstvv  या लिंकच्या माध्यमातून त्यात भाग घेता येईल. सुनावणीदरम्यान लोकांनी आपल्या मोबाइलमधील माईक बंद ठेवावा. सुनावणीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.