19 September 2020

News Flash

दूध आंदोलनावरून संघटनांमध्ये दुफळी

शेतकऱ्यांसाठी नवी मदत योजना लागू करण्याची सरकारची ग्वाही

संग्रहित छायाचित्र

राज्यातील ४६ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान आणि दूधभुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन मदत योजना आणण्याची ग्वाही पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी दिली. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने घेतला असून, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र ५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान १० रुपये प्रति लिटर थेट अनुदान द्यावे तसेच दूधभुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत शेतकरी संघटना आदी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेत दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी बैठक बोलावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:19 am

Web Title: faction in organizations over milk movement abn 97
Next Stories
1 विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीस मनाई
2 ‘खेलरत्न’ अंजली भागवत यांच्या कारकीर्दीचा वेध
3 स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीविना
Just Now!
X