राज्य सरकारने शुक्रवारी पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल केले असून पुण्यात शिक्षण आयुक्त म्हणून  पुरूषोत्तम भापकर यांची तर ठाणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उदय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिपेंद्र सिंग खुशवाह यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
प्रदीप व्यास यांची राज्य निवडणूक आयोगाचे सचिवपदी तर सीमा व्यास यांची हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. एस.पी. कडूपाटील यांची जमाबंदी आयुक्तपदी, व्ही.बी.पाटील यांची चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, शेखर गायकवाड यांची सोलापूर महापालिका आयुक्तपदी, सुशील खोडवेकर यांची नांदेड महापालिका आयुक्तपदी, राहुल रेखावर यांची हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, डी.बी. गावडे यांची गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, मिलिंद गावडे यांची अकोला पालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.