News Flash

भाजपची सत्ता येणार हा फडणवीसांचा शब्द

सरकार आल्यानंतर त्यांना सन्मानाची वागूणक दिली जाईल.

(संग्रहित छायाचित्र)

चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार; पक्षाच्या आमदारांची बैठक

भाजपच्या चिंतन बैठकांनंतर रोज आमचेच सरकार येणार असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात असून शनिवारी त्याचा पुनरुच्चार करताना राज्यात भाजपचेच सरकार येणार असा शब्द माजी मुख्यमंत्री व पक्षाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार व अयशस्वी उमेदवारांना दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या आमदारांची बैठक शनिवारी दादर येथील मुंबई भाजपच्या मुख्यालयात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपस्थित होते. भाजप व सहयोगी पक्षांनी १६४ जागांवर निवडणूक लढवली. १०५ जागांवर विजय झाला. तर ५९ जागांवर पराभव झाला. त्यापैकी ५५ जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना चांगली मते मिळाली आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या उमेदवारांशी संवाद साधला. फडणवीस यांनी शब्द दिला आहे की राज्यात भाजपचेच सरकार येईल. सरकार आल्यानंतर त्यांना सन्मानाची वागूणक दिली जाईल. आपापल्या मतदारसंघात त्यांना पुन्हा उभे राहता यावे यासाठी सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून  मदत आम्ही करू, असेही पाटील म्हणाले.

पराभवानंतरही या उमेदवारांची मानसिकता सकारात्मक आहे. आता लवकरच महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून पक्षाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पुढाकार घेण्याची या उमेदवारांची तयारी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन

राफेल प्रकरणात दिशाभूल केल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी राफेल विमानाच्या करारावरून मोदी सरकारवर आरोप केले होते. आता ते चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशाची दिशाभूल केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, असे पाटील म्हणाले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दादरमध्ये आंदोलन करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:10 am

Web Title: fadnavis word that the bjp will come to power abn 97
Next Stories
1 शिवसेनेचा असहकार व पवारांबद्दलच्या सहानुभूतीचा फटका!
2 पीएमसी बँक घोटाळा, माजी भाजपा आमदाराच्या मुलाला अटक
3 विषारी इंजेक्शन घेऊन केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या
Just Now!
X