ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पडून एक महिला जखमी झाली आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रुक्साना शहा (५०) असे या महिलेचे नाव असून या अपघातात तिच्या दोन्ही पायांना जबर इजा झाली आहे. तिला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:07 am
Web Title: fall from railway bridge woman injured