मुंबई : काळ्या बाजाराचे प्रमुख केंद्र असलेल्या डार्कनेटसह आता सामान्य संके तस्थळांवरही (सरफेस नेट) रक्तद्रव चाचणीबाबतच्या जाहिराती सायबर पोलिसांना आढळल्या आहेत. या जाहिरातींमध्ये रक्तद्रव उपलब्ध असल्याची ग्वाही आणि दर नमूद आहेत. मात्र अशा जाहिरातींवर विश्वास ठेवून व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

राज्याच्या सायबर विभागाचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवडय़ांपुर्वी डार्क नेटवर एक लिटर रक्तद्रव (प्लाझ्मा) १० लाख रुपये किं मतीला विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात आढळली होती. त्यानंतर डार्क नेटवर रक्तद्रव उपलब्ध असल्याचा दावा करणाऱ्या आणखी जाहिरातीही पाहिल्या गेल्या. हळूहळू सर्वसामान्य संकेतस्थळे किं वा सरफे स नेटवरही अधून मधून अशा जाहिराती झळकत आहेत. या जाहिरातींवर विश्वास ठेवून व्यवहार के ल्यास आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.

प्राधिकृ त यंत्रणेकडून रक्तद्रव दान किं वा रक्तद्रव उपचारांच्या शुल्कासह अन्य बाबींबाबत नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने चढय़ा कि मतीत रक्तद्रव विकत घेणे नियमबाह्य़ आहे. शिवाय रक्तद्रव उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवून प्रत्यक्षात नागरिकांचे संवेदनशील तपशील चोरणे, आर्थिक गंडा घालणे आदी गुन्ह्य़ांनाही आमंत्रण ठरू शके ल, असे सायबर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

रुग्णाच्या वजनानुसार म्हणजे एका किलोमागे पाच एमएल रक्तद्रव दिला जातो. करोनामुक्त रुग्णांची उदासिनता, नियम व अटी-शर्तीमुळे रक्तद्रवाचा सध्या तुटवडा आहे. हीच संधी साधून रक्तद्रवाचा काळाबाजार सुरू झाला. रक्तद्रव दान करण्यासाठी करोनामुक्त झाल्याचा आणि तंदुरुस्त असल्याचा वैद्यकीय दाखला आवश्यक असतो. ही प्रक्रिया परवाना असलेल्या प्रयोगशाळांमध्येच पार पाडली जाते. मात्र थेट रुग्णांकडून बनावट प्रमाणपत्राआधारे नियमबाह्य़ पद्धतीने रक्तद्रव संकलन होत असल्याचे निरीक्षण गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नोंदवले आहे. या जाहिरातींचा सुळसुळाट सुरू आहे.