अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अस्थींचं गंगेत विसर्जन करण्यात आलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आज त्याच्या अस्थी गंगेत विसर्जित करण्यात आल्या. मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी सुशांतने गळफास लावून घेत आत्महत्या केली. १४ जूनला घडलेल्या या घटनेमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली. त्यानंतर सोमवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी पार्ले येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज त्याच्या अस्थींचं गंगेत विसर्जन करण्यात आलं. एएनआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

काय घडलं १४ जून रोजी?

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीसाठी ही धक्कादायक म्हणावी अशीच घटना ठरली. सुशांत सिंह राजपूतने नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. दरम्यान यासंदर्भातलं वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिलं. या वृत्ताची दखल घेत खरोखरच सुशांतला डिप्रेशन आलं होतं का? हिंदी सिनेसृष्टीतील व्यावसायिक स्पर्धेमुळे सुशांतने आत्महत्या केली का? हे तपासण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले.

दरम्यान १५ जून रोजी त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. गळफासामुळेच सुशांतचा मृत्यू झाल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे. १५ जून रोजी संध्याकाळी ६ च्या दरम्यान सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांत सिंह राजपूत हा मूळचा पाटणा येथील होता. आज पाटणा येथे त्याच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं.