नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा प्रत्यय दिसून आला . प्रभागातील आपले वर्चस्व टीकून ठेवण्यासाठी नवी मुंबईत यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली होती. यंदा तब्बल ७ दाम्पत्यांनी निवडणुकीत विजय मिळवला असून दोन पिता-पुत्र आणि दोन बाप-लेकींनी महापालिका गाठली आहे. यामुळे नवी महापालिकेत ‘घराणेशाही’ नांदताना दिसणार आहे.  विशेष म्हणजे, मढवी परिवारातील मनोहर मढवी यांच्यासह त्यांची पत्नी विनया आणि मुलगा करण हे तिघेही विजयी झाले आहेत. तर, गवते परिवारातील चार जणं नवी मुंबई महापालिकेसाठी निवडून गेले आहेत.

 सात विजयी दाम्पत्य-
* शिवसेनेच्या अनिता पाटील आणि त्यांचे पती शिवराम पाटील
* राष्ट्रवादीच्या राधा कुलकर्णी आणि त्यांचे पती सुरेश कुलकर्णी
* अपक्ष उमेदवार रंजना सोनावणे आणि त्यांचे सुधाकर सोनावणे
* शिवसेनेच्या शुभांगी गवते आणि त्यांचे पती जगदीश गवते
* राष्ट्रवादीचे नवीन गवते आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गवते
* शिवसेनेच्या कोमल वास्कर आणि त्यांचे पती सोमनाथ वास्कर
* शिवसेनेचे मनोहर मढवी आणि पत्नी विनया मढवी

पिता पुत्राची विजयी जोडी-
विजय चौगुले आणि ममीत चौगुले (शिवसेना)
एम के मढवी आणि करण मढवी (शिवसेना)

बाप लेकीची विजयी जोडी-
अशोक गावडे आणि स्वप्ना गावडे (राष्ट्रवादी)
नामदेव भगत (शिवसेना) त्यांची मुलगी पूनम पाटील (काँग्रेस)